आवड आणि सवय !
आवड आणि सवय हे शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलोय. जीवनात ह्या शब्दांचे महत्व खूप आहेत. कारण हे शब्द आपल्या भावनांशी जुळलेली असतात. फार सोपं आहे हे दोन्ही शब्द बोलायला. पण ह्या दोघात एक फरक आहे , जे आपल्याला जाणवत नाही. ते अन्तर वेळ आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल आवड निर्माण होण्यासाठी किंवा निर्माण न होण्यासाठी वेळ लागत नाही. कारण कालांतरानं आवडी बदलत राहतात. आवडी बद्दल येणार्या सगळ्या भावना क्षणभंगुर असतात. लहानपणी आपल्याला आवडत असलेल्या कुठल्याही गोष्टी, नंतर आपल्या साठी महत्व ठेवत नाही. याचे कारण एकच असतो , ते म्हणजे त्याची जागा आत्ता दुसर्या गोष्टींनी घेतली आहे. अश्या खूप गोष्टी आहेत, जे काल आपल्याला आवडत होत्या, पण आज मात्र ते आवडत नाही. काय माहीत उद्या काहीतरी दूसरा आवडेल. आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी भेटल्यात तर लगेच आनंद होतो , आणि नाही भेटला की काही क्षण दुख सुद्धा होतो. पण त्यांनी इतका काही फरक पडत नाही, कारण त्यात मेहनत नसती ना. पण सवयची व्याख्या मात्र आवडी सारखी नाही. कुठल्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी किंवा सवय सोडण्यासाठी बराच वेळ लागतो. सवयी साठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण...