आवड आणि सवय !

आवड आणि सवय हे शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलोय. जीवनात ह्या शब्दांचे महत्व खूप आहेत. कारण हे शब्द आपल्या भावनांशी जुळलेली असतात. फार सोपं आहे हे दोन्ही शब्द बोलायला. पण ह्या दोघात एक फरक आहे , जे आपल्याला जाणवत नाही. ते अन्तर वेळ आहे.

कुठल्याही गोष्टीबद्दल आवड निर्माण होण्यासाठी किंवा निर्माण न होण्यासाठी वेळ लागत नाही. कारण कालांतरानं आवडी बदलत राहतात. आवडी बद्दल येणार्‍या सगळ्या भावना क्षणभंगुर असतात. लहानपणी आपल्याला आवडत असलेल्या कुठल्याही गोष्टी, नंतर आपल्या साठी महत्व ठेवत नाही. याचे कारण एकच असतो , ते म्हणजे त्याची जागा आत्ता दुसर्‍या गोष्टींनी घेतली आहे. अश्या खूप गोष्टी आहेत, जे काल आपल्याला आवडत होत्या, पण आज मात्र ते आवडत नाही. काय माहीत उद्या काहीतरी दूसरा आवडेल. आपल्याला आवडत असलेल्या गोष्टी भेटल्यात तर लगेच आनंद होतो , आणि नाही भेटला की काही क्षण दुख सुद्धा होतो. पण त्यांनी इतका काही फरक पडत नाही, कारण त्यात मेहनत नसती ना.

पण सवयची व्याख्या मात्र आवडी सारखी नाही. कुठल्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी किंवा सवय सोडण्यासाठी बराच वेळ लागतो. सवयी साठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण सवयीचे पहिले पाऊल आवड असते. एक असा क्षण येतो, जेव्हा आवड हा आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण अंग होऊन जातो. आणि त्याच क्षणी आपण म्हणतो की मला ह्याची सवय झालीये. पण एक गोष्टी मात्र लक्षात ठेवा, एका गोष्टी बद्दल आवडीची भावना निर्माण झाली म्हणून जुन्या गोष्टींचा अनादर करू नका. कारण भूतकाळात त्याच जुन्या गोष्टी तुमच्या सोबत होत्या. म्हणून आवड निर्माण करून स्वतःला किंवा दुसर्‍याला त्रास देण्या एवजी, चांगल्या गोष्टींची सवय लावून घेतली तर आयुष्य खूप सुंदर होईल.

- संतोष पांडेय

Comments

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"