मी, एप्रिल फूल आणि आइस क्रीम...

... चक्क आज १ एप्रिल चा दिवस होता. नेहमी प्रमाणे सकाळी उठून, नित्य क्रिया करून, आंघोळ आणि नास्ता करून कामाला सुरुवात केली. कोरोना मुळे घरूनच काम करायचं होतं. मात्र मला लक्षात नव्हतं की आज एप्रिल फूल करतात लोक. संध्याकाळी ६:४५ च्या जवळपास आत्याचा मेसेज आला की कोंबडी तुला भेटायला आली होती का ? मी बोललो - " नाही ! पण का ? ". मग आत्या बोलली की ती सकाळी पासून बाहेर गेलीय, पण आजुन घरी आलीच नाही. मग मला पण आला टेंशन, कारण ती अशी करत नाही. तिचा फोन पण बंद, एक तास प्रयत्न केला, पण काहीच प्रतिक्रिया नाही. काही ओळखीच्या मित्रांना पण विचारलं, पण त्यांना सुद्धा काहीच माहित नव्हता. मग शेवटी काम उरकून, मी तिला शोधायला निघालो. घरी पण सांगितलं की कोंबडी बेपत्ता आहे, म्हणून चाललोय तिला शोधायला. त्यातच तिला इथे-तिथे शोधतच होतो की कोंबडीचा फोन लागला. मी विचारल तिला की - " कुठे आहे ग बाई ? ", तर तिचा हसून उत्तर येतं की मुंबईला. मग मी तिला ओरडलो की - " सांगून तर जात जा ना ! ". तर ती म्हणे की तुझ्या सोबत आत्याने प्रँक केला. लय राग आला मला, पण जाऊदे बोलून दिला सोडून. आत्यानी नंतर माफी मागून कबूल केलं की - " It's just an prank ! ". तसाच मग मी एका मैत्रीणला भेटायला गेलो. एकतर रात्रीचा कर्फ्यू होता, म्हणून पुलिस लोकांची भीती सुद्धा होती. तरी आलोय तर भेटून जावा, म्हणून तिला कॉल करुन बोलवून घेतलं. ती येई पर्यंत मंदिरात जाऊन, दर्शन घेऊन आलो मी. देव पण म्हणाला मला की - " अरे बाबा ! किती ह्या मित्र-मैत्रिणी तुझ्या... एक दिवस तू यात हरवशील !! ". मी बोललो - " देवा ! तू भेट तर एकदा येउन यानां… तू पुन्हा वर जाणं विसरशील !!!! ". पण मनात मी बोललो की चुकून पण ह्यांना भेटू नका, नाहीतर तुमचं पण एप्रिल फूल करतील हे. तेवढ्यात ती मांजर चाळ ( Cat Walk ) करत करत आली. चष्मा पण घरीच विसरून आली ती. मी तिला अख्खा किस्सा सांगितलं आणि ते ऐकून ती जाम हसू लागली. म्हणजे अजुन लोकांना ह्या गोष्टी गंमत वाटतात. पण असो ! नंतर गप्पा गोष्टी करून घरी जाताना तिला आइस क्रीम खाऊ वाटल. आत्ता कर्फ्यू मुळे संध्याकाळी ८:०० ला दुकान बंद होतात, कुठून खाणार आइस क्रीम ? तरी आम्ही इकडे तिकडे फिरून एका हॉटेलच्या इथे पोहोचलो. तिथे, हॉटेलचे सर्व कामगार जेवत होते. आम्ही त्यांना आइस क्रीम मागितली, तर ते बोलले की आहे पण इथेच खावा लागेल. आम्ही बोललो की ठीके. मग तिने स्वतःला वॅनीला आणि मला बटर स्कॉच घेतला. त्यात तिचा गूगल-पे पण चालत नव्हता. मी बोललो की कॅश देऊ की आपण, पण तिचा जिद्द की गूगल-पेच करणार मी. तेवढ्यात तिथे पोलिस काका आले आणि दुकान मालकाला ओरडू लागले. ती बिचारी पण जाम घाबरली. तिला पोलिसांची जाम भिती वाटते. आम्ही पट-पट आइस क्रीम संपवली आणि मग  तिला तिच्या घरी सोडून, मी पण माझ्या घरी सुखरूप आलो. शेवटी एकच बोलतो - 
अंत भला, तो सब भला...

बरं झालं, पोलिसांनी मारलं नाही मला.

~ संतोष पांडेय ✍

Comments

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"