प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे आयुष्यातला अंधकार नव्हे तर प्रेम म्हणजे प्रकाश. असे असतानाही प्रेमात अपयश पदरी पडलेल्या जीवांना प्रेम म्हणजे काळोखातली पायपीट वाटते. कारण अपयशी प्रेमिकांच्या नशिबी केवळ ठेचाळणं आणि रक्तबंबाळ होणं येतं. जीवनातला अंधकार जरी प्रेमात सामावलेला असला , तरी चैतन्याचा प्रकाशही त्याच प्रेमात सामावलेला आहे. पाण्यात पडलेल्या पानाला जसं प्रवाहाच्या विरोधात जाता येत नाही , तसेच जन्माला आलेल्या जीवालाही प्रेमात पडण्यावाचून पर्याय उरत नाही. पणते नि : स्वार्थ , निरपेक्ष , निर्मोही प्रेम असावं. आसक्ती , अभिलाषा , मोह , भुरळ या गोष्टींना प्रेमात मुळीच थारा असू नये . तसं झालं तर प्रत्येक विवाह पैलतीरी जाणं फारसं अवघड नाही. भले मग तो प्रेमविवाह असो अथवा थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने केलेलं लग्न असो. समुद्रमंथनातून विविध रत्ने आणि अखेर अमृत सापडले अशी आख्यायिका आहे. प्रेम मला त्या अमृताचाही सार आहे , असे वाटते.
म्हणूनच एका कवितेत -
" प्रेमाहुनी जगी या , नसते सुरेख काही
हे सार अमृताचे , याच्यात विष नाही .
याच्यामुळेच होते , जगणे सुरेल गाणे
याच्यामुळे फुलोनि , येती उजाड राने. "
असे म्हटले आहे.
- एक प्रेम पुजारी 💑
वाचन : अन्तरजाल आभार 😃
Comments
Post a Comment