मासिक पाळी - बोलू की नको ?

आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता. एका राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळालबद्दल मी एक छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यात ती पण येणार होती. खूप दिवसांनी आम्ही एक-मेकांना भेटणार होतो. मी आधीच सगळ्यांना बोललो होतो की आज मी त्यांची ओळख माझ्या एका मैत्रिणी सोबत करून देणार आहे , म्हणून सर्व जण खूप उत्तसाहित होते. पार्टीची समधी तैयारी सुरू झाली. वेळ देखील हळू-हळू सरकू लागला. कधी संध्याकाळ होईल आणि कधी मी तिला भेटणार , असा वाटू लागला होता. संध्याकाळचे ५:०० वाजले आणि तिचा मेसेज आला की  " माफ कर मला , पण आज यायला जमणार नाही. तू पार्टी एन्जॉय कर. आपण नंतर पुन्हा भेटूया." 

अचानक मनातल्या सगळे उत्साह ढगात उडाल्या सारखे झाले. स्वप्नं तुटला की काय असा भान होऊ लागला. तरी मी स्वतःला सावरुन तिला कॉल केला आणि विचारला की " काय ग ? सगळं बरं आहे ना ?". ती हो बोलून थोड्या वेळ गप्प बसली. तिचा आवाज सुद्धा बदलला होता. जणू ती आपल्याकडून काही तरी लपवत आहे, असा मला जाणवलं. मी पुन्हा तिला विचारलं की " काही अडचण असेल तर सांगू सकतेस तू़ मला ". खूप आवेदन केल्यामुळे ती बोलली की " अरे ! मुलींच्या प्रॉब्लेम असतात. तुला काय कळणार त्यात ?". मला लगेच समझला की तिला नेमका काय अडचण आहे. मी लगेच तिला बोललो की " तू आराम कर , आपण नंतर बोलूया ".

खरंतर तिचा मासिक पाळी चालू झाला होता. तिला प्रत्यक्ष बोलता जरी नाही आला तरी आपल्याला कळायला नक्को का ? कारण मला माहीत होतं की मुलींना त्या दरम्यान चीड-चीड होणे , पाय-कंबर-पोट दुखणे , मूड परिवर्तन होणे , डाग पडणे असे बरच गोष्टींचा सामना करावा लागत. वरून समाजाने दिलेल्या त्रास वेगळाच सहन करावं लागतं. असा का घडतं बरं , की समाजात आपण मासिक पाळी हे शब्द स्वातंत्र्य पणे बोलूच सकत नाही ? ह्यात अडचण तरी काय आहे ? किती तरी शाळेत सुद्धा हे विषय नीट शिकवला जात नाही. मासिक पाळी ही एक प्राकृतिक घटना आहे. त्यात त्या मुलींचा काय कसूर असत ? असाम राज्याच्या एका गावात कामाख्या देवीचा एक मंदिर आहे , त्या देवीला मासिक पाळीची देवी म्हणून ओळखला जात. तिथे लोक त्या देवीचा पूजा करतात. मग मासिक पाळीत मुलींना मंदिर किवा मंदिराच्या परिसरातून लांब का ठेवला जात ? त्यांच्या कष्ट समझुन घेण्याचा सोडून , त्यांच्याशी भेदभाव का केलं जात ? हा समस्या प्रत्येक धर्मात आहे. 

पॅडमॅन चित्रपट सगळ्यांनी बघितलच असणार आहे. लोकांनी प्रतिसाद सुद्धा भरभरून दिली. पण नंतर काय ? तेच आपलं जे चालू होता ते. इथे पॅड सुद्धा असा आणला जात , जसा की बॉम्ब विकत घेतलं आहे. हे सगळं घडत कारण लोकांनी जर बघितली तर काय विचार करतील या , या भीतीमुळे. आणि हे सगळं काही बदलणार नाही. समजाजाचा नियम आहे ना , कसा आवाज उचलणार आपण ? आवाज उचलला की मग आपण द्रोही ठरतो. आपण त्यांच्या नियमांचा उलांघन करतोय म्हणुन आपल्याला शिक्षा सुद्धा सुनावली जातात. आणि मी तर मुलगा आहे , ह्या गोष्टी बद्दल बोललो म्हणुन या समाजाची लोक मला काय समजणार हे मला चांगलंच ठाऊक आहे . पण कधी पर्यंत या भीतीनं आपण आपल्या घराच्या स्त्रियांना दाबून ठेवणार ? आजुन किती कष्ट त्यांना देणार आपण ? आपल्याला आई , बायको , बहीण , प्रेमिका पाहिजे,  मग मासिक पाळीत अडकलेली मुलगी का नक्कोये ?

बघा जरा ! विचार करा यावर. समस्यांचा समाधान शोधा , उगीच मागून चालत आलेली रुढी किवा प्रथेचा आधारावर शोषण होऊन देऊ नका. या विषयवर जागरूकता आणायला हवं , टिप्पणी नक्को.

~ संतोष पांडेय ✍

Comments

  1. AnonymousMay 05, 2021

    Nicely composed.. Good job Santosh

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

When Men Are Not Allowed to Break 💔

"Dear Self, I will win, I promise!"

"When Men Break Down: The Untold Struggles Behind the Silence, the Outburst, and the Blame"