बालगंधर्व !
सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज मला चित्रपट पहावासा वाटला. चित्रपटाचं नाव होता " बालगंधर्व ". अतिशय सुंदर असा हा मराठी चित्रपट होता. संपूर्ण चित्रपट हा प्रसिद्ध रंगमंच कलाकार , नारायण श्रीपाद राजहंस ( नारायणराव ) उर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित होता. त्यात शेवटी एक खूप भारी असा निरोप दिलंय. ते म्हणजे -
" देवा ! हे जग म्हणजे रंगभूमी आहे. त्या नाटककारान लिहलेले प्रवेश आहेत ते. आपण तर फक्त सादर करणारे नट आहोत. हे दुःख ही खरं नाही , सुख ही खरं नाही. यश पण आपला नाही , अपयश पण आपला नाही. हे समध प्रवेश त्याने लिहलेले आहेत. देवा ! हेच सत्य मनात ठेवायचं आहे. पडदा पडताना जसा भूमिका रंगमंचावर सोडून बाहेर पडावा , तसाच आता या जगाचं सुद्धा निरोप घ्याचं आहे.
- नारायणराव 🙏 "
- संतोष पांडेय ✍
Comments
Post a Comment