मातृत्व म्हणजे काय ?
मातृत्व म्हणजे काय ?
काय आहे मातृत्व? आई होणे म्हणजे नेमके काय? हे प्रश्न दिसायला जरी अगदी सोपा असला तरी त्याचे नेमके उत्तर देणे अवघड आहे. मातृत्व म्हणजे केवळ बाळाला जन्म देणे इतकेच नसून त्यापेक्षाही बरेच काही आहे. नऊ महिने एक स्त्री आपल्या गर्भात पोषण करते आणि आयुष्य देते आणि नंतर ते आयुष्यभर हृदयात सामावून ठेवते. तुम्ही एकमेकांना भेटण्यापूर्वीच बिनशर्त, कधीही न संपणारे अशा प्रेमळ आत्म्याची काळजी घेत असता. मातृत्व म्हणजे आपल्या हाडामांसापासून एक नवीन जीव तयार करणे. हा आत्मा तुमच्या प्राधान्यक्रमात नेहमी पहिला असतो. ही भावना शब्दांत व्यक्त कारण्यापेक्षाही किती तरी मोठी आहे.मातृत्वाची भावना ही खरोखरी खूप सुंदर आहे.
मातृत्व फुलपाखरू किंवा इंद्र्धनुष्यासारखे अल्पायुषी नाही. मातृत्व म्हणजे प्रचंड वेदनादायी असले तरी मुलांबरोबर राहण्यासाठी धैर्य आणि आपली कार्यशक्ती आजमावण्याचे काम आहे. मातृत्व एक सशक्त आत्मा आहे याला घडविण्यासाठी आपल्या शरीरास वेगवेगळ्या बदलांना सामोरे जावे लागते. आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त असलेली ही प्रेमाची भावना आहे. हे प्रेम दिवसेंदिवस वाढतच असते.
मातृत्वामध्ये आईचे आपल्या मुलावर अंतःकरणापासून प्रेम असते तरीही ते कठोर आणि संरक्षणात्मक असते. आपल्या मुलांसाठी आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती हि सारखीच नसते त्यामुळे त्यांच्या पाठीशी कायम उभे राहणे गरजेचे असते. मातृत्वाचे काम हे आयुष्यभर घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे अखंड सुरूच असते. झोपेची नितांत गरज असताना सुद्धा आपल्या बाळाला कुशीत घेऊन झोपल्याशिवाय चैन पडत नाही. मातृत्वामध्ये आपल्या बाळाला आलिंगन देणे आणि गोड पापा देणे हे अपेक्षितच असते.
मातृत्व म्हणजे एकाचवेळी विविध जबाबदाऱ्या सांभाळून, विविध कौशल्ये आत्मसात केलेले तज्ज्ञ. मातृत्वामध्ये आपल्या बाळाला जगातील सर्वात अवघड गोष्ट शिकविण्याचे देखील धैर्य असते. अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःचे अश्रू आणि दुःख बाजूला ठेवून तुम्हाला त्याची अडचण सोडविण्यासाठी त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहायला लागते. मातृत्व म्हणजे प्रचंड अपेक्षांचे ओझे मानेवर घेऊन फिरल्यासारखे आहे. हे ओझे असूनही ताठ मानेने आयुष्याचा पुढील प्रवास सुरू ठेवायचा असतो. आपण आधीच स्वतःला कमकुवत समजत असताना आपल्यासाठी ते मजबूत असतात. जेव्हा ते आनंदाने हसत असता तेव्हा तुमच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू असतात. मातृत्व हे विविध भावभावनांचे मिश्र स्वरूप आहे.
वर दिलेली सर्व उदाहरणे मातृत्वाची भावना कशी कौतकास्पद आहे हे दर्शवणारी आहेत. पण अगदी जवळचे उदाहरण घेयचे झाले तर तुम्ही आणि तुमच्या आई मध्ये असलेले नाते पहा, एक आई म्हणून तोच प्रयत्न तुमची आई करत असते आणि तोच प्रयत्न तुमच्या मुलाशी वागताना करत असता. एकूणच मातृत्वाची भावना आणि भूमिका ही आदर आणि अभिमानास्पद अशीच आहे.
साभार : Tiny Step
Comments
Post a Comment